दोघाविरुद्ध रामतीर्थ ठाण्यात गुन्हा दाखल
अठरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त.
महाराष्ट्र वार्ता प्रतिनिधी
साईनाथ कांबळे
काल दिनांक 4 डिसेंबर रोजी नरसी बसस्थानका जवळ बेकायदेशीर ऑनलाइन महालक्ष्मी नावाचा जुगार खेळत व खेळवीत असणाऱ्या वर स्थानिक गुन्हे शाखा नांदेड ने धाड टाकून दोघा विरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखा नांदेडच्या पथकाने काल नरसी येथे एका बेकायदेशीर विनापरवाना ऑनलाइन महालक्ष्मी नावाचा जुगार (लॉटरी) वर धाड टाकून दोन आरोपीसह लगदी 3050 रुपये व संगणक मॉनिटर, प्रिंटर व इतर साहित्य जप्त केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामतीर्थ पोलीस ठाण्या मध्ये आरोपी भीमराव मोहन वाघमारे रा. औराळा व एकनाथ चोपवाड यांच्याविरुद्ध गुरन.393/25 कलम १२(अ), महाराष्ट्र जुगार कायदा सह कलम ३,४ लॉटरी अधिनियम १९९८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रचलित असलेले पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दारासिंग राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील गटलेवार, पोहेकॉ.मोहन हाके, यांनी सदर कार्यवाही केली आहे.
स्थागुशा ने केलेल्या या कार्यवाहीत मोठी रक्कम काही मिळाली नाही.यात केवळ नगदी ३०५० रुपये व संगणक मॉनिटर, प्रिंटर व इतर साहित्य मिळून एकूण १८५५० रुपयाची मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे.
पण पथक येणार असल्याची खबर किंवा भनक तालुक्यात सर्वात मोठा जुगार अड्डा चालवणारा नायगाव येथील एक इसम मोठ्या चतुराईने यातून निसटला हे मात्र खरे.
नरसी येथील चालत असलेल्या या बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी ( जुगार ) अड्या पेक्षा नायगाव येथे अशाच प्रकारचा मोठा जुगार (लॉटरी) चालू असल्याचे परिसरात चर्चा आहे.
नायगाव येथील अड्ड्यावर कार्यवाही झाली आणि त्या अड्ड्याचा मालक पोलिसांच्या हाती लागला तर मोठे रॉकेट उघड होण्याचे संकेत आहेत. असेही बोलल्या जात आहे. सदर जुगार अड्ड्याचा मालक फार चतुराईने पथका जवळ येऊन गेल्याचे सुद्धा कार्यवाही दरम्यान बघणाऱ्या लोकांनी चर्चा करीत आहेत.
नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय नायगाव येथे चालणाऱ्या बेकायदेशीर ऑनलाईन अड्ड्यावर वरिष्ठ स्तरावर काय कार्यवाही करतील? व या सर्वांचा कर्ता करविता च्या मुसक्या आवळतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण काल नरसीत कार्यवाही झाली आणि आज नायगावात वरील नमूद इसमाचे ऑनलाइन जुगार(लॉटरी) अड्डा चालू असल्याचे सुद्धा नागरिक बोलून दाखवित आहेत.
या कार्यवाहीने अवैध धंदेवाल्यांना धडकी भरली हे मात्र निश्चित.





