देगलूर
देगलूर तालुक्यातील मौजे खानापुर ता देगलुर येथिल इंदिरा आवास नगर येथे सद्या बेकायदेशिर व बिनापरवानगी शिंदी व दारु विक्री केली जात असलेले रसायन मिश्रीत शिंदी सध्या जोमात विक्री केली जात आहे. त्यामुळे इंदिरा आवास येथील नांगरीकांचे जिव धोक्यात आले आहे. तसेच इंदिरा आवासमध्ये बेकायदेशिर व अवैधरित्या दारुची विक्री केली जात आहे. त्यामध्ये अव्याच्य्या सव्वा भावाने दारु विकणे तसेच या दांरुमुळे अनेकांचे संसार उघडयावर आले तरुण मंडळी दारू शिंदे च्या आहारी जाऊन बर्बाद होत आहेत नसेत आपण कोणतेही कृत्य करित आहोत याचे भान राहात नसल्यामुळे युवा पिढी नष्ट होत आहे दारु व शिंदी सेवन केल्यामुळे अनेक परिवार उघडयावर यऊन कौटुंबिक हिंसाचारासारखे प्रकार वाढले आहेत. याच अवैद्य शिंदी व दारुच्य्या विक्रीतेमुळे सामाजिक सलोखा नष्ट होऊन दररोजच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. असे आशयाचे निवेदन राज उत्पादन शुल्क विभाग देगलूर व उपजिल्हाधिकारी देगलूर यांना निवेदन देऊन निवेदन करते नागेश यलपा पलपवार व समस्त इंदिरा आवास नगर येथील नगरवासी यांनी निवेदनावर स्वाक्षरी करून दिले आहे निवेदनाचा तात्काळ चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावे अन्यथा इंदिरा आवास नगर येथील अबाल वृद्ध नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गंभीर इशारा दिला आहे






