बिलोली, दि.23मे:
शहरातील घंटा गाडीकडून रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याची बातमी ‘नांदेड चौफेर’ने उघडकीस आणल्यानंतर आता कुंडलवाडी रोडवरील ITI जवळील कचरा डेपोतच दररोज प्लास्टिकयुक्त कचरा जाळला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात विषारी धूर व तापमान वाढीचे साम्राज्य पसरले आहे.
🔥 निवेदनातून धक्कादायक वास्तव उघड
सुल्तानपूर, ता. बिलोली येथील नागरिक शिवलिंग इबिते यांनी दि. 29/04/2026 रोजी मुख्याधिकारी, नगर परिषद बिलोली यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यावर दि. 30/04/2026 रोजी आवक-जावक लिपिकाचा शिक्का आहे. 19 दिवस उलटूनही कारवाई शून्य.
निवेदनातील ४ गंभीर मुद्दे:
१. शासन नियम धाब्यावर: बिलोली शहराचा संपूर्ण प्लास्टिकयुक्त ओला/सुका कचरा शासन निकषानुसार विल्हेवाट न लावता कुंडलवाडी रोडवरील ITI जवळच्या डेपोत दररोज जाळला जातो.
२. 24×7 विषारी धूर: ओला कचरा व प्लास्टिक जाळल्यामुळे आठवड्याचे सात दिवस, चोवीस तास विषारी धुराची निर्मिती चालू आहे व त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
३. शाळा-ITI-वस्ती धोक्यात: कचरा डेपो परिसरात एक माध्यमिक शाळा, एक आयटीआय कॉलेज, एक उर्दू माध्यम निवासी शाळा व नागरिकांची निवासी घरे आहेत. लहान मुले व विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
४. तापमान वाढ: कचरा जाळल्यामुळे परिसरातील तापमान वाढून नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे.
🚨 Solid Waste Management Rules 2016 चे उल्लंघन
कचरा जाळणे हा फौजदारी गुन्हा आहे. NGT च्या आदेशानुसार कचरा जाळणाऱ्यांवर 25,000 रु. पर्यंत दंड व 5 वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. तरीही बिलोली न.प. स्वतःच कचरा जाळत आहे. “स्वच्छ भारत” चा बोजवारा उडाला.
नागरिक शिवलिंग इबिते यांची मागणी:
१. कचरा डेपोमध्ये आग लावणे तत्काळ बंद करावे.
२. प्लास्टिकयुक्त कचऱ्याची शासन निकषानुसार विल्हेवाट लावावी.
३. कमीत कमी आग तरी लावू नये व विषारी प्रदूषण थांबवावे.




