वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नांदेड उत्तर युवा जिल्हाध्यक्ष आकाश जोंधळे यांच्या वतीने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. तरोडा (बू.) प्रभाग क्रमांक २ मधील वैशाली नगर परिसरातील लहान विद्यार्थ्यांना शालेय स्कूल बॅगांचे वाटप करण्यात आले. तसेच महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना साड्यांचे वितरण करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या सुनिताताई रूपकराव जोंधळे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अविनाश भोसीकर, जिल्हाध्यक्ष राज अटकोरे, जिल्हासचिव विनोद वाघमारे, नगरसेवक प्रतिनिधी आकाश रूपकराव जोंधळे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पवळे, संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनीही समाधान व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.





