वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; बाळासाहेबांच्या कार्याचा विद्यार्थ्यांना परिचय
बिलोली, ता. ९: भीम सूर्याचा प्रकाश आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांच्या सूचनेनुसार बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथे अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
डॉ. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अभ्यासिका व वाचनालयात वंचित बहुजन आघाडी बिलोली तालुका सदस्य व पत्रकार मारोती एडकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देऊन वही, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.
बाळासाहेबांची भूमिका विद्यार्थ्यांपर्यंत
यावेळी मारोती एडकेवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे वंचित घटकातील लोकांना सत्तेत बसवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतात व महाराष्ट्रात कुठेही एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक, भटके-विमुक्त, महिला व सामान्य नागरिकांवर अन्याय झाल्यास त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला धारेवर धरून रस्त्यावर उतरून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम ते करत आहेत.”
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते चेअरमन अहमद साहब, शाखा उपाध्यक्ष मोहम्मद बिल्लोना, शाखा सचिव बालाजी एडकेवार, पत्रकार राजेश अमेटवार, ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर, साहेबराव एडकेवार, शिवाजी एडकेवार, अनिल एडकेवार, ईश्वर एडकेवार, सुनील अंजनीकर, संजय भालेराव, संतोष अंजनीकर, अजय एडकेवार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अभ्यासिका व वाचनालय, हिप्परगा थडी येथे विद्यार्थ्यांना वही, पेन व फळे देऊन आदरणीय बाळासाहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.





