बिलोली
(गौतम गावंडे )
तालुक्यातील मौजे कासराळी येथे स्व. गंगारामजी पिराजी चरकुलवार यांच्या १८ व्या पुण्यस्मरणानिमित्त व वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महा आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हे शिबिर दि. १६ मे २०२६ रोजी शनिवार सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुख्य बाजारपेठ कासराळी येथे पार पडले. कासराळी व परिसरातील गरजू रुग्णांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत ३०० पेक्षा अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिरात हृदयरोग, न्यूरो, जनरल फिजिशियन, अस्थिरोग, नेत्ररोग, दंतचिकित्सा, स्त्रीरोग आदी विविध आजारांवरील तपासणी व मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले. अनुभवी डॉक्टरांच्या टीमने रुग्णांची तपासणी करून आवश्यक शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून , भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख, जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार, भाजप जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील हायगले, शिवसेना जिल्हाप्रमुख मंडे साहेब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख व्यंकट पाटील, भागवत लोकमनवार तसेच ज्ञानेश्वर मोहनराव लोकमनवार सेवा सहकारी सोसायटी चेअरमन प्रतिनिधी गोविंद बदे्वाड, अरविंद पेंटे, गोविंद हांडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराचे आयोजन बाबुराव गंगाराम चरकुलवार यांनी केले होते. ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल परिसरातून समाधान व्यक्त करण्यात आले.





