बिलोली, दि. ९ मे: महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५७० व्या जयंती महोत्सवानिमित्त बिलोली येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल
मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ, बिलोली येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप
नवयुवक भीम जयंती मंडळ, आंबेडकर नगर, बिलोली यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध व कोट्यवधींच्या स्वप्नांचे आधार, संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.
प्रमुख उपस्थिती:
- उद्घाटक: मा. संतोष दादा कुलकर्णी, नगराध्यक्ष न.प. बिलोली
- प्रमुख वक्ते: मा. सुरेशदादा गायकवाड, आंबेडकर चळवळीचे भाष्यकार
- अध्यक्ष: मा. एल.एम. जाधव, सेवानिवृत्त सहशिक्षक
- स्वागत अध्यक्ष: मा. प्रकाश मरीबा पोवाडे, माजी नगरसेवक व जेष्ठ पत्रकार
विशेष आकर्षण – कडुबाई खरात यांचे भीमगीते
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका मा. कडुबाई खरात यांचा बुद्ध व भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. “तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र” या फेम गीताने त्या रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
प्रमुख पाहुणे व उपस्थिती
मा. अनुपदादा अंकुशकर, मा. सौ. आम्रपाली पोवाडे, मा. सौ. अनुपमा गायकवाड, मा. संदीप कटारे, मा. राजू कुडके, मा. शिवाजी गायकवाड यांच्यासह मा. सौ. विना जाधव, मा. विमलबाई जाधव, मा. सौ. लताबाई जाधव, मा. सौ. रेखाबाई पोवाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आयोजक मंडळ
अध्यक्ष हंसराज पोवाडे, उपाध्यक्ष विकास जाधव, सचिव रमेश पोवाडे, कोषाध्यक्ष संघपाल जाधव व सहसचिव आशिष जाधव यांच्या नेतृत्वाखाली नवयुवक भीम जयंती मंडळाने जय्यत तयारी केली आहे. सूत्रसंचालन जाधव धम्मपाल एकनाथराव करणार आहेत.
“सर्व आंबेडकर अनुयायांनी व बुद्ध उपासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी”असे – आयोजकांच्या वतीनेआवाहन करण्यात आले आहे





