- पत्रकारांनाही प्रवेश मिळाल्याने नाही
लिलावात अनियमितता व प्रसिद्धीच्या नियमांचा भंग झाल्याने लिलाव रद्द करण्याची मागणी.
बिलोली
येथील नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या शहरातील जुने बस स्थानक परिसरातील 14 गाळ्यांचा दि.५ फेब्रुवारी रोजी लिलाव करण्यात आला.मात्र प्रक्रिया पार पाडत असतांना मुख्याधिका-यांनी नियमबाह्य पणे सर्वांसमक्ष लिलाव न करता,गाळे लिलावाची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी न करता नगर परिषद येथे जाहीर प्रगटन लावले देखील नाही,अनामत रक्कम ही अव्वाच्या सवा ठेवून गरजू व होतकरू व्यापा-यांना दुर ठेवून आपल्या दालनात दार बंद करून लिलाव प्रक्रिया पार पाडली असून विशेष म्हणजे लिलाव प्रक्रिया पार पडत असतांना मुख्याधिका-यांनी पत्रकारांनाही आपल्या दालनात प्रवेश न दिल्यामुळे यात काहीतरी मिलीभगत झाल्याची चर्चा होत आहे.
बिलोली नगर परिषदेच्या वतीने 14 व्या वित्त आयोग योजने अंतर्गत १४ व्यापारी गाळ्यांचे बांधकाम केले होते.या व्यापारी गाळ्यांचे बांधकाम झाल्यापासून सदरचे व्यापारी संकुल वादाच्या भोवऱ्यात सापडले असून सर्वात अगोदर ज्या ठिकाणी हे व्यापारी संकुल उभारण्यात आले ती जागा मुळात मुख्याधिकारी यांच्या निवसस्थानासाठी आरक्षित होती.मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधींनी आरक्षित असलेल्या जागेवर व्यापारी संकुल उभारल्यामुळे बरेच वर्ष हे व्यापारी संकुल धुळखात पडून होते. त्यानंतर काही वर्षापुर्वी या व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या लिलाव करण्यात आला.मात्र लिलावा नंतर गाळ्यांची दुरुस्ती व सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले नसल्याचे व्यापारी संकुलातील दुकाने सुरू झाली नव्हती. त्यानंतर मात्र नगर परिषदेने पुर्वीच्या लिलावात गाळे घेतलेल्या व्यापा-यांना कोणतीही कल्पना न देता दि.5 फेब्रुवारी रोजी या गाळ्यांचा फेर लिलाव केला. विशेष म्हणजे या गाळ्यांच्या फेर लिलावा बाबत शहरातील व्यापारी व नागरीकांना कोणतीही माहिती नसताना,गाळे फेर लिलावा बाबत नगर परिषदेच्या माहिती फलकावर फेर लिलावाची नोटीस न लावता आणि विशेष म्हणजे लिलावेळी पत्रकारांना दुर ठेवून नियमानुसार अनामत रक्कम ही सुरूवातीच्या बोली रक्कमेच्या 5 ते 10 टक्के एवढी ठेवणे अपेक्षित असतांना सुशिक्षित बेरोजगार, सर्वसामान्य व्यापाऱ्यांना दुर ठेवण्याच्या उद्देशाने बोली रक्कमेच्या 50 टक्के म्हणजेच तब्बल एक लाख रुपये अनामत रक्कम ठेवल्याने अनेकांना यात भाग घेता आल्याने व लिलाव प्रक्रिया ही सभागृहात न घेता नगर परिषद मुख्याधिका-यांच्या दालनात मोजक्याच लोकांना घेऊन बंद दाराआड 14 गाळ्यांचा लिलाव करण्यात आला आल्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले असून सदरची फेर लिलाव प्रक्रिया रद्द करण्याची मागणी समाज सेवक सय्यद रियाज यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी व नगर परिषद च्या मुख्याधिका-यांकडे लेखी तक्रार केली आहे.






