मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना प्रभाग 2(ब)चा अधिकृत उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये**
खासदार रविंद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष हंनमत पाटील बेटमोगरेकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारास दीला पाठिं
नांदेड महाराष्ट्र वार्ता
मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 2(ब) चे काँग्रेसचे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार शेख मालनबि. छोटुमिया तसेच त्यांचे प्रतिनिधी शेख शकील छोटुमिया यांनी काँग्रेसचा सोडचिठ्ठी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे.
युवा नेते कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांच्या उपस्थितीत दोघांनीही औपचारिक पक्षप्रवेश केला. या अचानक झालेल्या हालचालीमुळे प्रभाग 2(ब) मधील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले असले तरी काही तासांतच काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी खासदार रविंद्र चव्हाण व हनमंत पाटिल बेटमोगरेकर यांच्या आदेशानुसार उमरी नगर परिषदचे वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग 1अ चे उमेदवार सौ् मंगल गंगाधर लांडगे तर प्रभाग 2ब मधील सय्यद नजमिया इलियास यांना जाहीर पाठिंबा दिला आहे
मतदान काही तासांवर असताना घडलेल्या घडामोडी मूळे उमरी शहरात खळबळ उडाली आहे






