गावकऱ्यांनी केले सहशिक्षक सौ.मुनेश्वर पि.डि.व बालाजी भेंलोडे यांचं कौतुक
बिलोली.
तालुक्यातीलपीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अटकळी ता बिलोली येथे आज दि 26जानेवारी 2026रोजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर म्हणजे उपस्थित मान्यवरांची शाल श्रीफळ तसेच शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर असे मधुर आवाजात स्वागत गीत सौ उर्मिला कलेटवाड यांनी गायले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ मुनेश्वर पी डी यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री रणवीर डोंगरे यांनी जि प शाळेचे महत्व लोकांना पटवून दिले आणि आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच पाठवा असे आवाहन गावकऱ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी नुरीया इस्माईल शेख आणि भाग्यश्री गोविंद बत्तलवाड यांनी केले. कार्यक्रमात देशभक्ती गीत लोकगीत नाटिका आदींचा समवेश होता. कार्यक्रमांची सुरुवात सत्यम शिवम सुंदरा या गीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.सरपंच प्रतिनिधी श्री उत्तमजी बत्तलवाड, उपसरपंच श्री रणवीर पाटील डोंगरे, श्री शिवराम पाटील डोंगरे,चेरमन श्री बजरंगजी बत्तलवाड, दयानंदजी भद्रे,श्री भास्करजी भालेराव, श्री अमोलजी शेरे, ,श्री राजेश पोलकमवाड, श्री गंगाधर शेरे, गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते शा. व्य. समिती अध्यक्ष श्री मारोती पोलकमवाड, उपाध्यक्ष श्री बजरंग पोलकमवाड शाळेचे मुख्याध्यापक श्री कलेटवाड डी एन, श्री भेलोंडे बी आर, श्री चव्हाण जे एस, श्री शहापूरकर एस बी, सौ मुनेश्वर पी डी, सौ मठदेवरू एस आर, सौ मुधाळे व्ही व्ही, सौ चालीकवार जी एच, सौ आईलवार एल टी, सौ वाघमारे ए पी श्री कपिल सर तसेच मल्लिकार्जुन पोलकमवाड, सौ सगुणा पोलकमवाड आदि सर्वजण उपस्थित असून सर्वांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.




