छाप्यात पाच आरोपी व केवळ 5550 रोख रक्कम मिळाले यामध्ये चतुर जुगारी पोलिसाच्या हातावर तुरी देऊन पळाले.
तालुका प्रतिनिधी/साईनाथ कांबळे
बिलोली तालुक्यातील रामपूर येथे जुगार चालत असल्याची गुप्त माहिती रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे यांना मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार सदर जुगार अड्ड्यावर धाड टाकून कार्यवाही केली. यामध्ये मोठी रक्कम किंवा हाय प्रोफाईल इसम काही मिळून आले नाही परंतु पाच आरोपी मिळून आले. गेल्या अनेक दिवसापासून पोलिसांना लपवत रामपूर, पाचपिपळी परिसरात जोरदार अवैद्य तीरट,अंदर बाहेर नावाचा जुगार खेळला जात होता. काल रोजी पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे यांना गुप्त माहिती द्वारे कळाले की, रामपूर शिवारात जुगार चालू आहे. मिळालेल्या या माहितीनुसार रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या आदेशान्वये पीएसआय नरवाडे यांनी आपल्यासोबत पोलीस कर्मचारी घेत,सदर जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये चतुर जुगारी असणारे व हाय प्रोफाईल जुगारी पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केल्याची माहिती समोर येत आहे. गुरन.04/2026 कलम 12 अ, यासह महाराष्ट्र जुगार कायदा यान्वे पोलीस कॉन्स्टेबल अशोक येरपलवाड यांच्या फिर्यादीनुसार रामतीर्थ पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 6जानेवारी 2026 रोजी दुपारी 03 वाजून 30 मिनिटांच्या दरम्यान खालील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शंकर बाबू नीलमवार वय 36 वर्ष रा. पाचपिंपळी, चंद्रकांत ज्ञानोबा शेळके वय 32 वर्ष रा. पाचपिंपळी, योगेश अशोक रामपुरे वय 28 वर्ष रा. पाचपिंपळी, विठ्ठल मारुती इंगळे वय 35 वर्ष रा.आदमपूर, नितीन मारुती गजभारे वय 32 वर्ष रा. कुंटूर यांना ताब्यात घेऊन, पाच 5550 रुपये मुद्देमाल जप्त करून त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे यांनी दिली आहे. चतुराईने पळून गेलेल्या जुगारी व यासह लगत असलेल्या गागलेगाव, बोरगाव गावातील शिवारात दररोज जागा बदलून चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी महाराष्ट्र वार्ता च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. या कार्यवाही मध्ये किरकोळ रक्कम जरी मिळाली तरी,जुगार खेळणारे व खेळविणारे यांचे धाबे निश्चितपणे दणाणले आहेत. लवकरच बाकीच्या जुगारावर कार्यवाही होईल का ?अशी चर्चा अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे.
“लोहगाव परिसरामध्ये अशा अवैद्य पणे चालत असलेल्या जुगार अड्ड्याबद्दल आम्हाला माहिती मिळाल्या नंतर लवकरच त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात येईल. आणि रामतीर्थ पोलीस ठाण्याचे हद्दीत अशा प्रकारचे कसलेच अवैद्य धंदे चालू देणार नाही.”
सपोनि विक्रम हराळे (पोस्टे रामतीर्थ)





