बिलोली प्रतीनीधी
पत्रकारितेला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनवणाऱ्या आणि निर्भीड लेखणीच्या जोरावर अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने लढा देणाऱ्या प्रतिमा चंद्रकांत शिंदे यांना अखिल जनलोक संपादन पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘जनलोक वार्ता राज्यस्तरीय उत्कृष्ट संपादक पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे.
जनलोक वार्ता चे प्रतिनिधी म्हणून आपल्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या प्रतिमा शिंदे यांनी स्वतःच्या कष्ट, जिए आणि अनुभवाच्या जोरावर पत्रकारितेत आपली वेगळी ओळख निर्माण केली. अनेक चढ-उतार, अडचणी आणि संघर्षातून त्यांनी मार्ग काढत ‘साप्ताहिक धैर्यसिद्धी’ हे साप्ताहिक यशस्वीपणे प्रकाशित केले आणि संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली,
सामाजिक अन्याय, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, प्रशासकीय दुर्लक्ष, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या यावर त्यांनी सातत्याने निर्भीड आणि अभ्यासपूर्ण बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यांच्या बातम्यांमुळे अनेक प्रकरणे उजेडात आली असून, संबंधित यंत्रणांना कारवाई करावी लागली, त्यांच्या लेखणीमुळे समाजात सकारात्मक बदल घडून आल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अखिल जनलोक संपादन पत्रकार संघाच्या वतीने ‘साप्ताहिक धैर्यसिद्धी’ साठी राज्यस्तरीय उत्कृष्ट संपादक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती संघाचे संस्थापक राजू शिंगाडे यांनी दिली.पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. हा विचार त्यांनी आपल्या कार्यातून प्रत्यक्षात उतरवला आहे. सामान्य नागरिकांचा आवाज शासन दरबारी पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असून, या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला आणखी बळ मिळणार आहे. “प्रतिमा शिंदे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात जिद्द, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकीचे आदर्श निर्माण केले आहेत. त्यांचे कार्य नव्या पिढीतील पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे.” असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.





