नायगांव/ प्रतिनिधी
जिगळा पुनर्वसन (नरसी) तालुका बिलोली येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 24 जानेवारी पासून सुरुवात झाला. तर सांगता 31 जानेवारी रोजी होणार आहे आणि 1 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताह निमित्त दररोज पहाटे 5 ते 6 वाजता काकडा भजन, सकाळी 6 ते 7 श्री विष्णू सहस्त्र नाम स्त्रोत, सकाळी 7 ते 10.30 वाजता ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 11 ते 12 वाजता गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 वाजता हरिपाठ व रात्री विविध कीर्तनकाराचे हरिकीर्तन व हरिजागर होईल.
गेल्या तीन दिवसात ह.भ.प प्रवीण महाराज पारडीकर,ह.भ.प.गणेश महाराज बेंद्रीकर, ह.भ.प.नागोराव महाराज एकलारकर यांचे कीर्तन झाले तर दिनांक 27 जानेवारी रोजी ह.भ.प. महादेव महाराज पांगरीकर यांचे कीर्तन.
दिनांक 28 जानेवारी रोजी ह.भ.प. मारुती महाराज मोटरगेकर यांचे कीर्तन.
दिनांक 29 जानेवारी रोजी ह.भ.प.माधव पल्ले महाराज लातूर यांचे कीर्तन.
दिनांक 30 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार झी टॉकीज फेम भागवताचार्य ह.भ.प. रुपालीताई सवणे परतुरकर यांचे विशेष किर्तन.
दिनांक 31 जानेवारी रोजी ह.भ.प.हनुमंत काका अगराळे लातूर बोरी यांचे काल्याचे किर्तन होईल व सप्त्याहाची सांगता होईल. या दिवशी जिगळा नगरी चे माजी सरपंच प्रतापराव पाटील जिगळेकर यांचा महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तर दिनांक 1 फेब्रुवारी रोजी तृतीयपंथी यांचे गुरु फरीदा बकस यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.
गावात आतापर्यंत कधी न झालेला सप्ताह गेल्या चार वर्षां पासून जिगळ्याचे माजी उपसरपंच राहुल जिगळेकर यांच्या पुढाकारातून यशस्वी रित्या संपन्न होत असल्याने गावात आनंदाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी राहुल जिगळेकर मित्र मंडळाच्या वतीने जागतिक बौद्ध धम्म परिषद साजरी केली जाते. यासोबतच मोहरम जलसां मध्ये मित्र मंडळ आग्रही असतात. आणि हा गेल्या चार वर्षापासून हाती घेतलेला नवीन उपक्रम यशस्वीरित्या चालू असल्यामुळे राहुल जिगळेकर यांची सर्व धर्मा बद्दल असलेली सहिष्णुता दिसून येत आहे.
दिनांक 30 जानेवारी रोजी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.रूपालीताई सवणे यांच्या विशेष कीर्तनाचा व वरील सर्व नमूद कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे प्रताप पाटील जिगळेकर, सरपंच रावसाहेब पाटील येरडे, पोलीस पाटील संजय पाटील जिगळेकर आनंदा पा. कानोले, ज्ञानेश्वर पा. कानोले, मधुकर पा.पिसाळे, कपिल गजभारे, राम कानोले, विद्याधर कांबळे, विठ्ठल बनसोडे राहुल जिगळेकर मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ जिगळेकर यांच्या सह गावातील नागरिकांनी अहवान केले आहे.





