बिलोली
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण, कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जाणीवपूर्वक डावणाऱ्या जातीय मानसिकतेतून केलेल्या कृत्याबाबत, बिलोलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, व प्रभारी मुख्य अधिकारी श्री बालाजी मेट्टेवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी कायदा व भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात यावे याबाबत आज बिलोली तालुका वंचित बहुजन आघाडी व समविचारी , पक्ष,प्रजासेना, रिपब्लिकन सेना, संभाजी ब्रिगेड,कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना,या सर्व व सामाजिक संघटने तर्फे,माननीय उपविभागीय अधिकारी, यांना निवेदन देण्यात आले आहे, दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण भारतात भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा, करण्यात आला, सदर दिवशी दीर्घकालीन परंपरेनुसार आधुनिक भारताचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची, स्थापना व पूजन करणे अनिवार्य आहे, परंतु बिलोली नगर परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या, प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात बिलोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, व महात्मा गांधी चौक येथे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या, प्रतिमेची जाणीवपूर्वक पूजा व प्रतिमा डावलण्यात आले हा प्रकार केवळ,प्रशासकीय हलगर्जीपणा नसून जातीय देशातून व जातीयवादी मानसिकतेतून,जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला आहे सदर,हा कृत्य बिलोली शहराचे नवनिर्वाचित,नगराध्यक्ष श्री संतोष कुलकर्णी यांच्या मानसिक जातीवादी या विचारातून गंभीर प्रकाराचे,जातीयवाद डाव मनामध्ये ठेवून,हा अपमान बाबासाहेबांचा करण्यात आला आहे,व प्रभारी मुख्याधिकारी श्री बालाजी मेट्टेवाड हे पूर्ण जबाबदार आहेत, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या,महामानवाच्या अशा प्रकारे अपमान करणे, हा स्पष्ट अपमान असून,अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल पत्र गुन्हा तसेच, भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमाखाली, विशेष पात्र अपराध आहे, तरी सदर प्रकरण नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी व प्रभारी मुख्याधिकारी श्री मेट्टेवाड यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायदे अंतर्गत भा. द. सं. अंतर्गत, तात्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा दोषेवर कठोर कारवाई, करण्यात यावी,अन्यथा भविष्यात अशा प्रकारचा संविधानिक आपमान होऊ नये,यासाठी स्पष्ट प्रशासित निर्णय देण्यात यावे,अशी नम्र मागणी, या संदर्भात प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास दिनांक, 30 जानेवारी 2026 रोजी कार्यालयांमध्ये, न्याय मागणीच्या मोर्चा,सर्व समविचारी पक्षाच्या नेतृत्वात,वंचित बहुजन आघाडी,काँग्रेस पार्टी,राष्ट्रवादी पार्टी,व उद्धव ठाकरे शिवसेना,रिपब्लिकन सेना, व प्रजासना,व सर्व संविधानिक सामाजिक संघटने, यांच्यातर्फे आज उपविभागीय अधिकारी बिलोली यांना, निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावरती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष धम्मदीप बाबुराव गावंडे, महासचिव गजानन चिंतेले, गंगाधर कांबळे, पाशाभाई गादीवाले सामाजिक कार्यकर्ता, गौतम भालेराव,मारोती एडकेवार, मारोती कांबळे,सतीश पोवाडे,अमोल शेरे, बंडू जाधव, अभिनंदन शेरे, समाधान जाधव, घाटे दिलीप,आधी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वाक्षऱ्या असून,समविचारी पक्षांतर्गत सामायिक रित्या दिलेल्या निवेदनामध्ये,काँग्रेस पक्षाचे,वंचित बहुजन आघाडीचे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, व शिवसेना व रिपब्लिकन सेना, व प्रजासना या,सर्व पक्षाच्या कार्यकर्ते,व पदाधिकारी व नेत्यांचे स्वाक्षरी आहेत.






