*मंत्री गिरीष महाजन प्रकरणी नायगावात पडसाद.**
प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विसर पडलेल्या टाकळी (तमा), मरवाळी,घुंगराळा, येथील प्रशासनाविरुद्ध नायगाव येथे तीव्र निषेध सभा संपन्न.*
प्रतिनिधी/नायगांव साईनाथ कांबळे
प्रजासत्ताक दिनानिमित्त साजरा करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात नाशिक येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाम उल्लेख न केल्याने वनसंरक्षक माधवी जाधव यांनी आवाज उठवला. याचा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आलेल्या भाषणात, जलसंपदा तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री महाजन यांनी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाम उल्लेख न केल्याने महाराष्ट्रात ठीक, ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी नायगाव तालुका च्या वतीने दिनांक 27 जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवा सचिव बालाजी गायकवाड रातोळीकर यांच्या नेतृत्वात निषेध सभा घेण्यात आली. सभेमध्ये वंचितचे तालुका अध्यक्ष साहेबराव कोपरेकर,सतीश वाघमारे, दीपक गजभारे, साईनाथ नाईकवाडे,भूषण काळेवार,राजू भद्रे,बबलू नरसीकर, घंटेवाड साहेब,यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी होते. या सोबतच तालुक्यातील टाकळी (त.मा) येथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्याने संविधान प्रेमी व आंबेडकरवादी लोकांची भावना दुखावल्या प्रकरणी संबंधित ग्रामपंचायत अधिकारी अर्थात ग्रामसेवक ललिता बेलुरे, सरपंच सौ.नागमणी बालाजी कुरे, यांच्यासह संबंधित दोषीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट व इतर कलमा सह गुन्हा दाखल करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष साईनाथ जिगळेकर, मुगाव येथील माजी उपसरपंच विश्वंभर कांबळे यांनी नायगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. मरवाळी येथील सेवा सहकारी सोसायटी कार्यालयासमोर तिरंगा ध्वज उलटा फडकवण्यात आला आहे.यामुळे संबंधित चेअरमन बळवंत पवळे व सरपंच छायाबाई केशव पवळे यांच्यासह सोसायटीचे सचिव यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. अन्यथा देशप्रेमी व संविधान प्रेमी लोकाद्वारे लवकरच तालुका भर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन साईनाथ जिगळेकर, विश्वभर कांबळे,सचिन भेदे नरसीकर, यांच्यासह अनेकाने पोलीस ठाणे नायगावचे पोलीस निरीक्षक मारकवाड यांच्याकडे केले आहे. तर नायगाव येथे करण्यात आलेल्या निषेध सभेत वंचित बहुजन आघाडीचे तालुका, जिल्हा, युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायगाव तालुक्यातील टाकळी तमा, घुंगराळा,मरवाळी,नायगाव नगरपंचायत येथील प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक न केल्यास दोन दिवसात युवा नेते बालाजी गायकवाड रातोळीकर यांच्या नेतृत्वात तालुका भर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.





