नरसी/साईनाथ कांबळे
नांदेड जिल्ह्यातील तबलीग जमातीच्या वतीने इस्तेमा कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असते हा कार्यक्रम यावर्षी शंकरनगर तालुका बिलोली येथे दि. ७ व ८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात अनेक मौलाना उपस्थित समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले .
शंकरनगर येथे सुमारे 15 एकरच्या मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आले होते तर सभा मंडपापासून ते गोदावरी मनावर सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत विद्युत रोषणाई करण्यात आल्याने सुमारे 16 वर्षापासून बंद पडलेला कारखाना पुन्हा एकदा विद्युत रोषणाईने प्रकाशाच्या उजेडात कारखाना परिसर उजाळून निघाला होता.
शंकरनगर तालुका बिलोली येथे आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसाच्या इस्तेमा कार्यक्रमासाठी येणाऱ्या समाज बांधवांची कसलीही गैरसोय होऊ नये यासाठी शंकरनगर येथील गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या मैदानावर या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करुन भव्य पेंडॉल उभारण्यात आला या ठिकाणी समाज बांधवांसाठी वजूखाना, तहारधखाना,बैतुलखाना याचे योग्य नियोजन करण्यात आले होते येथे लागणाऱ्या पाण्यासाठी सुमारे 50 हजार लिटर पाण्याचे संब(हौद) व 20 -20 हजार लिटरचे दोन टँकरची व्यवस्था करण्यात आली होती.
येणाऱ्या वाहनांची योग्य पार्किंग झाली पाहिजे यासाठी टू व्हीलर पार्किंग व फोर व्हीलर पार्किंग अशा वेगवेगळ्या दोन पार्किंग तयार करून यासाठी 100 स्वयं सेवकाची नेमणूक करण्यात आली होती तर जेवणासाठी दोन झोन आणि चहा पाण्याचे स्टॉल ना नफा न तोटा या तत्त्वावर कहाळा येथील समाज बांधवाकडून व्यवस्था करण्यात आली होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर नगर व परिसरातील समाज बांधव शेख फारुख अब्दुलसाब, शेख गौशमिया चांदसाब, सत्तार चांदमिया ईनामदार यांच्या प्रमुख नेतत्वाखाली शेख पीरअहेमद मदारसाब, दौलताबादी साजिद रशीदसाब, शेख आजमुद्दीन बासूसाब, शेख अमीर अहेमदसाब, हाजी अजमेर दौलताबादी, शेख अहेमद रसूलसाब, शेख युनूस मैनोदिन, शेख असिफ बाबूनिया, पठाण अक्रम समदखान, पटेल अब्दुलरहीम हैदरसाब यासह शंकरनगर परिसरातील अनेक समाज बांधव तन-मन-धनानी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयपूर्तीने मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी विक्रम हराळे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवले होते.




