एका वर्षात दोनदा एटिएम फोडणारे दोन आरोपींना संभाजीनगर येथुन अटक
बिलोली प्रतीनीधी विलास शेरे
नांदेड देगलुर राज्य मार्गावर असलेल्या बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील एसबीआय च्या बाजुला असलेल्या एटीएम केंद्रात 19 सप्टेंबर 2024 रोजी आणि 24 आक्टोंबर 2025 रोजी एका वर्षात दोनदा अज्ञात चोरांनी गॅस कटरने कापून एटिएम मधुन मध्यरात्री कट करून लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या अटल चोरट्यांच्या मुसक्या अखेर रामतीर्थ पोलिसांनी आवळल्या आहेत, तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज, तसेच गोपनीय माहितीच्या आधारे दि.13 फेब्रुवारी रोजी रामतीर्थ पोलीसांनी छत्रपती संभाजीनगर येथून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सध्या त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.रामतीर्थ पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या धाडसी एटीएम फोडी प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 313/2025 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी अशी ओळख निर्माण केलेले सपोनि विक्रम हराळे यांनी आपल्या पथकासह तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि राज्याबाहेरील हालचालींचा मागोवा घेत अखेर आरोपींचा ठावठिकाणा लागला. पोलिसांनी तात्काळ पथक रवाना करून छत्रपती संभाजीनगर येथून दोघांना ताब्यात घेत रामतीर्थ पोलीस ठाण्यात आणले,
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे-
मोहम्मद कैफ नजमुद्दीन (वय 21, रा. उलेता, ता. फिरोजपूर, जि. नुहू, राज्य हरियाणा)
आझाद इसरू खान (वय 24, रा. झारोकरी, ता. पुन्हाना, जि. नुहू, राज्य हरियाणा)
दोन्ही आरोपी हरियाणा राज्यातील असून नांदेड जिल्ह्यात इतर ठिकाणीही त्यांनी अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या टोळीचे जिल्ह्यातील इतर गुन्ह्यांशी संबंध उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आरोपी जेरबंद झाल्याने शंकरनगरसह रामतीर्थ हद्दीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सपोनि विक्रम हराळे व त्यांच्या पथकाच्या तडफदार आणि नियोजनबद्ध कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून जिल्ह्यात त्यांच्या कारवाईची जोरदार चर्चा रंगली आहे.
रामतीर्थ पोलिसांच्या या यशस्वी कार्यवाही मुळे गुन्हेगारांची गय केली जानार नाही असे रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी विक्रमजी हराळे यांनी सांगितले आहे.या धाडशी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे..





