महाराष्ट्रातील पहिले तृतीयपंथी कीर्तनकार समाधान महाराज यांनी भाविकांना केले भावूक
नरसी/ साईनाथ कांबळे
नरसी येथून जवळच असलेल्या जिगळा पुनर्वसन रामतीर्थ येथे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. सर्व गावकऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या या सप्ताहात काल रात्री महाराष्ट्रातील पहिले तृतीयपंथी कीर्तनकार समाधान महाराज दौंडकर यांचे कीर्तन संपन्न झाले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिगळा क्रमांक दोन येथे अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 12 फेब्रुवारी पासून चालू आहे.आज पर्यंत ह.भ.प. शंकर महाराज खिसे,ह. भ.प.ज्ञानेश्वर महाराज लिंगापूरकर,ह.भ.प. श्रीधर महाराज कासराळीकर,ह.भ.प. ज्ञानेश्वरी ताई ह.भ.प. बोबडे महाराज अहिल्यानगर, ह.भ.प. श्याम सुंदरी महाराज आष्टीकर यांचे कीर्तन झाले.तर
काल ह. भ. प.समाधान महाराज दौंडकर यांचे कीर्तन संपन्न झाले त्यांनी तृतीयपंथी यांची व्यथा व समाज भावना अतिशय मार्मिक शब्दात मांडली. त्यासोबतच जिगळा येथे वास्तव्यास असलेले नांदेड जिल्ह्याचे गुरु माय फरीदा बकस यांनी दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सहभाग घेऊन पंगत घेत असतात. यासाठी संपूर्ण जिगळावासीय त्यांना आदरतीर्थ मानत असतात.हा तृतीयपंथीयांचे भाग्य समजावे असे नव्हे तर आमच्या सारख्याना समाजाने नाकारलेल्या लोकांना आपण एकसंघ घेऊन मान सन्मान देता हे फरीदा बकस यांच्या चांगल्या कार्यामुळेच होय. असे कौतुक व जिगळा वासियांचे आभार ह. भ.प.समाधान महाराज यांनी मानले आहेत. तर परिसरात पहिल्यांदाच तृतीयपंथी कीर्तनकार आल्याने त्यांची वाणी ऐकण्यासाठी रामतीर्थ, नरस, कुंचोली, डोणगाव, टाकळी, यासह अनेक गावातील भाविक भक्त व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
जिगळा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा ज्यांनी तृतीयपंथी समाजाला जिगळा येथे आश्रमास जागा उपलब्ध करून देणारे राहुल जिगळेकर, प्रसिद्ध उद्योजक भास्कर पाटील जिगळेकर,शंकर माली पाटील कानोले,भुजंग माली पाटील कानोले, पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, पत्रकार अमरदीप गोधने,युवा नेते मधुकर पाटील पिसाळे, राम पाटील कानोले, यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.





