अनिल बुध्देवार यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
देगलुर प्रतिनिधी:-
बिलोली तालूक्यातील खतगांव येथील वंचित बहुजन आघाडीचे समर्थक यांच्या नेतृत्वाखाली तालूक्यातील असंख्य मुस्लीम तरुणांनी देगलुर येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचार सभेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचार सभेदरम्यान देगलूर येथे वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा पार पडली अनिल बुध्देवार यांनी वंचित बहुजन आघाडी प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी देशात आर एस एस व भाजपा सारख्या मुस्लीम विरोधी भुमिके विरोधात ठाम पुणे भुमिका घेतली मुस्लीम व ओबिसी दलीत समाजाला बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय पर्याय नाही . व वंचित बहुजन आघाडीची ध्येय धोरणे अनेक दीवसापासुन सांगत असतात त्यामुळे या मुस्लीम तरुणांना पक्षाची भुमिका पटल्यामुळे अटकळी व तालुक्यातील मुस्लिम युवकांनी राज्य उपाध्यक्ष फारूक अहमद साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत एकत्रितपणे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे या प्रवेशात अटकळी येथील मोईन शेख, मस्तान शेख, शेख गणी नबी कुरेशी अलीम शेख सोनू शेख जूनेद शेख शाबोबोदीन पठाण अकबर शेख यांच्यासह विविध मोहल्ल्यांतील, विविध व्यवसायांतून येणाऱ्या शेकडो युवकांचा सहभाग होता. या वेळी राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी प्रवेश करणार्या यूवकाच यावेळी सत्कार करण्यात आला जिल्हा महासचिव शाम कांबळे वंचित बहुजन आघाडीचे अमृत नंरगलकर सुनिल कुमार देगलुरकर तालूक्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते





