वंचित बहुजन आघाडीचे नेते
धैर्यवर्धन फुंडकर यांच्या फेसबुक पेजवरून
अगदी वर्ष होण्याच्या आधीच नवनियुक्त मुंबई प्रदेशच्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्री चेतन अहिरे महिला आघाडीच्या अध्यक्ष स्नेहल सोहनी आणि युवा आघाडीचे अध्यक्ष श्री सागर गवई यांनी अपूर्व अशी संविधान सन्मान महासभा आयोजित करून वंचित बहुजन आघाडीला आणि सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जाच मिळून दिली.
माननीय बाळासाहेब आणि माननीय प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांचे मार्गदर्शन सोबतीला श्री रोकडे सर आणि पक्षाचे धुरीण श्री सुमित आनंद यांचा आधार असला तरी या नवनियुक्त तरुण पदाधिकाऱ्यांनी अचंबित करणारी आणि इतर राजकीय पक्षांच्या छातीत धडकी भरवणारी प्रचंड विराट महासभा आयोजित करून येणाऱ्या सर्व निवडणुकांचा रणशिंगच फुंकलेला आहे.
पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि तालुका जिल्ह्याचे पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्यस्त असताना इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्रित करणे आणि त्यांना मुंबईला सभेसाठी येण्यास प्रोत्साहित करणे यासाठी या टीमचे कौतुक करावे तितके कमी आहे.
एरव्ही अशा सभांसाठी पक्ष महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुका जिल्ह्याच्या युनिटला प्रोत्साहित करून सहकार्य करण्यास आव्हान करतच असते परंतु यावेळी परिस्थिती वेगळी होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळणं मुश्किलच होते आणि पक्षाने देखील तसे आव्हान केलेले नव्हते परंतु तरीही जिद्द आणि चिकाटीने कठीण परिस्थितीवर मात केलेली आहे.
मुंबईतीलच आणि आजूबाजूच्या परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोबिलाइज करून आणि विशेष म्हणजे एक टीम म्हणून काम करण्यास प्रवृत्त केले हे या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे यश आहे.
या संविधान सन्मान महासभेसाठी तुमच्या एकत्रित प्रयत्नांबद्दल धन्यवाद, टीम. तुमच्या प्रत्येकाशिवाय हे साध्य झाले नसते. सर्वांनी दाखवलेल्या समर्पणाची आणि टीमवर्कची मी खरोखर प्रशंसा करतो.वंचित बहुजन आघाडीच्या यशासाठी तुमचे कठोर परिश्रम आणि वचनबद्धता महत्त्वाची आहे.
अशा तरुण ऊर्जावान तरुणाई सोबत काम करण्याचा खुप खुप आनंद आहे.
तुमच्या सर्वांच्या अपूर्व योगदानाबद्दल प्रत्येकाचे आभार
संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे “वचने किम दरिद्रता” म्हणजे दुसऱ्यांशी बोलताना / दुसर्यांविषयी बोलताना तरी शब्दांचा दळीद्रीपणा / कंजूषी करू नये.
म्हणून हा लेखन प्रपंच






