नरसी /महाराष्ट्र वार्ता
साईनाथ कांबळे
नरसी ता नायगाव येथे सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 69 रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवास अभिवादन केले व सायंकाळी असंख्य अनुयायांच्या वतीने कॅन्डल मार्च(अभिवादन रॅली) काढण्यात आला . नरसी जुने गाव येथील लुम्बिनी बुद्ध विहार येथे सकाळी तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर उपस्थित विद्यार्थी व युवकांनी प्रकाश टाकला. सायंकाळी 6 वाजता लुम्बिनी बुद्ध विहार पासून असंख्य महिला,विद्यार्थी,युवक,ज्येष्ठ नागरिक हातात जळती मेणबत्ती घेऊन नरसी येथील मुख्य रस्त्याने अभिवादन रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्य चौकात रामतीर्थ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे,पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे, सामाजिक कार्यकर्ते देविदास सूर्यवंशी, लालबा सूर्यवंशी,माधव कोरे,जब्बार शेख, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बर्गे, पत्रकार गंगाधर भिलवंडे, यांनी अभिवादन रॅली मधील महामानवाच्या प्रतिमेस पुष्प मालिका घालून अभिवादन केले. मुख्य चौकात भीम अनुयायाच्या वतीने त्रिशरण पंचशील पठण करण्यात आले यानंतर सदर अभिवादन रॅली चे परत लुम्बिनी बुद्ध विहार जुने गाव नरसी येथे जाऊन सांगता करण्यात आली. मुख्य चौकात फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच च्या वतीने उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, पोलीस उपविभागीय अधिकारी पानेगावकर, तलाठी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय आप्पा बेळगे, बिलोली तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपळीकर, दिलीप पांढरे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत 69 रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवास कृतिशील अभिवादन केले.अभिवादन रॅली यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गंगाधर भेदे, सचिन भेदे, सूर्यकांत भेदे, धम्मदीप भद्रे,अरविंद भेदे, सुनील भेदे, शुभम भेदे, किरण भेदे, विजय भेदे,साहेबराव भेदे, राष्ट्रपाल सूर्यवंशी यांच्या सह अनेकांनी परिश्रम घेतले.






