.बिलोली प्रतीनीधी( विलास शेरे)
बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील शेतकरी माधव रामलु चुन्नमवार,यांनी कर्ज बाजाराला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतीचे, फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे, घर परिवार कसे चालावे यासाठी रामलु चुनमवार यांच्यावर, कर्ज काढण्याची वेळ आली. कर्जाचा डोंगर हा वाढतच गेला, या सर्व कर्जाचा डोंगर,डोक्यावरती घेऊन त्यांनी, तेलंगाना येथील एलपूर मंडळ, बालकोंडा जिल्हा निजामबाद,येथील शेत जमीन कौलाने केले होते. त्या ठिकाणी ही शेतीचे व पिकाचे,मोठया प्रमाणात पिकाची नुकसान झाल्यामुळे, शेतकरी माधव रामलू चुन्नमावर मोठया संकटांमध्ये सापडले, आता कर्ज कसे फेडणार, सरकारकडून सुद्धा कोणत्या गोष्टीची मदत मिळाली नसून,सगरोळी येथील अनेक शेतकऱ्याला अजून सुद्धा मदत मिळालेली नाही,कर्जबाजारी झाल्यामुळे, माधव रामलु चूनमवार, यांनी कर्ज कसे फेडावे अतिवृष्टीमुळे शेतीचे, व पिकाचे मोठ्या प्रमाणात,सगरोळी येथील शिवारात नुकसान झाले,व बाहेरील तेलंगणामध्ये एल्पुर येथे शेती,करून सुद्धा त्याही शेतामध्ये नुकसान झाले.आणि एवढा मोठा कर्ज मी कशा प्रकारे फेडू,या दुःखाने शेतकरी माधव रामलु चुन्नमवार, यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली,त्यांच्या यामुळे सर्व सर्कलमध्ये, शोकांतिका पसरली आहे, व त्यांच्या पश्चात पत्नी,दोन लहान मुले, व चुनमवार परिवार सगरोळी ग्रामस्थ आहेत.


