परिसरातील दिग्गज नेते उपस्थित राहणार.
नरसी ,(साईनाथ कांबळे)
जिगळा येथे उद्या दिनांक 14 रोजी तृतीयपंथी समाजाचे कुलदैवत असलेली बहुचराजी माता यांची दरवर्षी प्रमाणे जलसा मोठा उत्सवा मध्ये साजरा होणार आहे.
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, राज्यसभा खासदार अजित गोपछडे,कमल फाउंडेशनचे सचिव अमरदीप गोधने,भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील भिलवंडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपळीकर, सरपंच रावसाहेब पाटील येरडे, यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देवीचे पूजन व हवन करण्यात येईल.
सायंकाळी ठीक 6 वाजता तृतीय पंथीयांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल या कार्यक्रमाची मेजवानी व महाप्रसादाचे नियोजन राहुल जिगळेकर मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
तालुक्यात कुठेच न होणारा असा वेगळा आगळा कार्यक्रम व कार्यक्रमातून भक्तजनांना व हौशी- नवसी लोकांना भक्ती गीता सह सांस्कृतिक कार्यक्रमा चा आनंद घेण्यास मिळणार आहे तरी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे तृतीयपंथी समाजाच्या गुरु फरीदा बकस व युवा नेते राहुल जिगळेकर यांनी आहवान केले आहे.






