तलाठी व मंडळ अधिकारी यांना प्रभारी तहसीलदार तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे सदर गाड्यातील वाळूचे मोजमाप करण्याचे आदेश.
नायगांव (साईनाथ कांबळे)
दिनांक 18 मार्च रोजी होटाळा परिसरात क्षमतेपेक्षा जास्त लाल वाळू ने भरलेली दोन हायवा सहाय्यक पोलीस अधीक्षक शशांत गौडा यांनी पकडून नायगाव ठाण्यात लावल्या. व यावर कार्यवाही करण्यासाठी महसूल प्रशासनाचा अभिप्राय अर्थात गाडी चालकाकडे असलेली पावती वैद्य अवैद्य अशी माहिती मागितली.
यावर आज सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रभारी तहसीलदार डोनरू अनया रेड्डी यांनी मंडळ अधिकारी व तलाठी नायगाव यांना सदर गाड्यातील वाळू ची मोजमाप करण्याचे आदेश दिले व पोलिसांना योग्य ती कार्यवाही करण्याचे कळविले.
पोलीस प्रशासनाकडून खरे तर सदर पावत्या वैध की अवैध? यामधील वाळू किती ब्रास आहे? याबद्दल चौकशी करून कळविणे अशा आशयाचे पत्र महसूल विभागाला देणे अपेक्षित होते. परंतु संबंधित बीट जमादार यांनी केवळ ईटीपी वैध की अवैध हे कळवा एवढेच माहिती मागितल्याने तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागातील महसूल अधिकारी (अवल कारकून) शिवकुमार देवकते यांनी शब्दशः अर्थ धरून सदर पावत्या वैध आहेत असे पत्र काढले.व दोन्ही प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. आणि यातून अर्थपूर्णरित्या सदर गाडी मालकास व रेती घाट चालकास वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचेही दिसून येत आहे.
ही बाब सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर कांबळे मुगावकर यांनी आज सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रभारी तहसीलदार अन्यया रेड्डी यांच्या लक्षात आणून दिले. प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक गौडा यांनी पकडलेल्या एम.एच. 46 सी.एल. 4619 व एम.एच. 24 बी.7337 या दोन हायवा अवैध ई.टी.पी. कमी व जास्तीचा रेती वाहतूक करीत शासनाची फसवणूक व रेती चोरी केल्याप्रकरणी वाहन चालक- मालक व लिलावधारक यांच्यावर कायद्यानुसार दंडात्मक व इतर गुन्हा नोंद करावे अन्यथा दिनांक 24 मार्च रोजी नायगांव तहसील कार्यालया समोर अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनही दिले.
ही बाब गांभीर्याने घेत प्रभारी तहसीलदार तथा सहाय्यक जिल्हाधिकारी रेड्डी यांनी तलाठी व मंडळ अधिकारी नायगाव यांना सदर गाड्यातील वाळूची मोजमाप करून अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहे.
दरम्यान मोठ्या अधिकाऱ्याने गाडी पकडल्याने मोठी कार्यवाही होईल या धास्तीने संबंधित गाडी चालक- मालकांनी प्रशासनाकडे सादर केलेल्या पावत्या तीन गाड्यांचे असल्याचे बाब समोर आली आहे.
दोन गाड्या पोलीस ठाण्यात जमा आहेत परंतु तिसरी गाडीच गायब असल्याने सदर कार्यवाही कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसरी गाडी शोधणार कोण? तहसील की पोलीस प्रशासन? असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
विश्वंभर कांबळे मुगावकर यांनी दिलेल्या निवेदनुसार कार्यवाही झाल्यास नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारकवाड व रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हराळे यांचे पितळ मात्र उघड पडणार आहे. असे दिसून येत असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.






