घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा पुरेसा आहे. कोणीही अफवा वर विश्वास ठेवू नका.…
…… डॉ. जगदीश बारदेवाड. (जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड)
साईनाथ कांबळे
सध्या चालू असलेल्या जागतिक घडामोडी मुळे नांदेड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी कृत्रिम गॅस सिलेंडरचा तुटवडा केला जात असल्याचे पहावयास मिळत आहे. 950 रुपयाचा गॅस तब्बल 1500 ते 2000 रुपयास विकत घ्यावे लागत असल्याने, सामान्यांना याची झळ सोसावी लागत आहे.
नायगाव व बिलोली तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी गॅस वितरकाकडून घरगुती गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा दाखवत ग्राहकाकडून अधिकचे पैसे उकळण्याचा धंदा चालू केला असल्याचे नागरिकाकडून बोलल्या जात असल्याने व समाज माध्यमा वरही यावर जोराने चर्चा असल्याचे दिसून आले.
हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून प्रेस नोट द्वारे जाहीर केले आहे की, जिल्ह्यात कुठेही घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. सध्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेले गॅस सिलेंडरची संख्या 22445 तर ट्रान्सपोर्ट (वितरणामध्ये) 21505 अशी एकूण 42199 गॅस सिलेंडर उपलब्ध असल्याचे कळवले आहे.तेव्हा कोणत्याही ग्राहकाने अथवा नागरिकांनी पॅनिक बुकिंग व अधिकचे पैसे देऊन गॅस सिलेंडर घेऊ नये. यामध्ये कोणी काळाबाजार करीत असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 8668223326 या मोबाईल नंबर वर तक्रार नोंदवावी. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या भरारी पथकाने त्यावर तात्काळ कारवाई करेल. अशी माहिती डॉ.जगदीश बारदेवाड (जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड) यांनी दिली आहे.





