बिलोलीबिलोली तालूक्यातील केरुर येथील राजकीय जादूगर म्हणुन ओळखले जाणारे शेतकरी संघटनेचे माजी पदाधिकारी व माजी सरपंच दीगांबर हजारे यांची भारतीय जनता पक्ष जिल्हा अनुसुचित जाती जिल्हा चिटणीस पदी निवड करण्यात आली आहे . हजारे तालूक्यातील जूने जाणते राजकारणातील अनूभवी कार्यक्रते म्हणून ओळखले जातात . शेतकरी संघटनेत ते अनेक वर्ष काम केले . भास्करराव पाटील खतगावकर यांच्या अंत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. बिलोली तालुका खरेदी विक्री संघाचे ते माजी संचालक आहेत . केरुरचे सरपंच म्हणुने काम केले अशा अनुभवी असलेल्या ग्रामीण भागात पक्षाची वाढीसाठी केलेले काम पाहुन भारतीय जनता पक्षाच्या अनुसुचीत जाती मोर्चा चिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.





