बिलोली.(साईनाथ कांबळे)
बिलोली तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी व आधार कार्ड जमा करण्याचे आवाहन दिव्यांग तहसीलदार शिंदे यांनी केले आहे.कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार राज्यातील दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ व पारदर्शक पध्द्तीने देण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण ओळखपत्र युडीआयडी ई दिव्यांग प्रमाणपत्र व आधार कार्ड संबंधित योजनांशी संलग्न करणे आवश्यक करण्यात आले आहे .राज्य शासनामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनच्या इंदिरागांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले युडीआयडी कार्ड व आधार कार्ड संबंधित कार्यालयात तात्काळ जमा करावे शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभाथ्यर्थ्यांना मिळणारे मासिक अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्र बैंक खात्याल डीबीटी पध्द्तीने जमा करण्यात येणार आहे त्यामुळे योजनांचा लाभ अखंडपणे सुरु राहण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेवर सादर करणे अत्यावश्यक आहे. तरी बिलोली तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले (युडीआयडी) कार्ड व ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड संबंधित तहसिल कार्यालय बिलोली येथे 31 मार्च 2026 पूर्वी तात्काळ जमा करावे असे आवाहन बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे व नायब तहसीलदार अनिल परळीकर यांनी केले आहे.





