बिलोली
तालूक्यातील अटकळी येथे मुस्लिम समाजाचा पवित्र सण
रमजान ईदच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे ग्रामविकास पॅनल प्रमुख शिवाजी पाटील डोंगरे यांच्या कडून दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील जामा मस्जिद मध्ये इफ्तार पार्टीचे बूधवारी आयोजन करण्यात आले होते
. शिवाजी डोंगरे यांच्या कडून दरवर्षी मुस्लिम समाज बांधवाचा पवित्र सण असलेल्या रमजान ईदच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत असते . ग्रामीण भागात असलेला हींदु मुस्लिम एकतेचा संदेश या निमित्ताने दीला जातो . यावेळी जामा मस्जिद कमिटीचे पदाधिकारी सय्यद खयुम शेख अश्फाक शेख जावेद शेख गौस अहमद शेख मुख्तार अमिन शेख मस्तान पञकार जावेद अहमद शेख आयनूमिया संरपंच प्रतिनिधी उत्तम बत्तलवाड शिवाजी पाटील डोंगरे व्यंकट खपाटे दयानंद भद्रे बजरंग पोलकमवाड विठ्ठल पोलकमवाड शिवलिंग गायकवाड शिवाजी गायकवाड बाबुराव जाधव यावेळी उपस्थित होते





