अध्यक्षपदी अमोल परशुराम कांबळे तर सचिव पदी सचिन यशवंत भेदे यांची निवड
नायगांव/साईनाथ कांबळे
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 135 वी जयंती सर्वत्र साजरी होणार आहे. नुकतेच नरसी येथे यावर्षी च्या जयंती मंडळाची कार्यकारणी निवडण्यासाठी लिंम्बुनी बुद्ध विहार जुने गाव नरसी येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गंगाधर भेदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
यावर्षीची नूतन भीम जयंती मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी अमोल परशुराम कांबळे,उपाध्यक्ष सचिन प्रचंड, बुद्धभूषण भेदे, तर सचिव पदी सचिन यशवंत भेदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्यकारणी पुढील प्रमाणे सदस्य अक्षय झगडे,उत्तम नरसीकर ,विकास सोनकांबळे,रणजीत हणमंते,अनिल भेदे,साहेबराव भेदे,स्वप्निल भेदे, सुशांत भेदे ,दिनेश भेदे,नागेश भेदे,विलास नरसीकर,श्रीनीवास तरटे ,शुभम भेदे, राहुल डुमने, रोहन भेदे,रामजी गजले, भास्कर भेदे,सूर्यकांत भेदे, रवी भेदे आदी जणांची सदस्य पदी निवड करण्यात आली.
या वर्षीची जयंती उत्सवात साजरी होणार आहे.सोबतच आदर्श व प्रेरणादायी आगळी वेगळी जयंती साजरी करणार आहोत. यामध्ये महापुरुषाचे विचार जनसामान्यांमध्ये पोहोचण्यासाठी देखावे त्यांचे सुविचार संपूर्ण नरसी परिसरामध्ये लावून अतिरेक खर्च कमी करून वेगळे समाज उपयोगी उपक्रम राबवत एक वेगळा आदर्श निर्माण करणारी जयंती होणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव सचिन भेदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
नरसी गाव परिसरामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये मोठे शहर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी महापुरुषाच्या विचारांशी अभिप्रेत असलेली जयंती साजरी झाली तर पंचक्रोशी मध्ये एक आदर्श निर्माण होणार आहे.
या झालेल्या बैठकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य हनुमंत भेदे, शिवाजी भेदे, दौलत भेदे, विजय भेदे, हनुमंत तुळशीराम भेदे, दिगंबर भेदे, भाऊराव भेदे, दशरथ भेदे, सुनील भेदे, सतीश भेदे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




