प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जनतेत संताप; सामाजिक कार्यकर्ते यांचा आंदोलनाचा इशारा
बिलोली
साईनाथ कांबळे
शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून, नागरिकांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे पाणीपुरवठा विस्कळीत असताना दुसरीकडे प्रशासनाकडून ‘नळ पट्टी’ वसूल केली जात आहे. ही नळ पट्टी तातडीने माफ करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख पाशा भाई व समाज सेवक सय्यद रियाज यांनी केली आहे.
शहरातील पाणी पुरवठा मागील 6-7 वर्षापासून या त्या कारणाने अनेक ठिकाणी कायम बंद आहे. परंतू नगर प्रशासन सदा झोपलेल्या अवस्थेत शहरातील जनता तहानलेली राजकीय पुढारी डामडौल मध्ये आमदार निष्क्रीय मग प्रशासन काय करीत आहे? शहरात मुलभूत सुविधाची वनवा पसरलेली आहे. उन्हाळा लागलेला आहे.
देशाला स्वतंत्र होवून 90 वर्षे पुर्ण झाली.तालुक्याचे मुख्य शहर असून शहराला जुनाट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा 4-8 दिवसाआड होता तो आजघडीला पूर्णतः बंद आहे. हे नगर प्रशासनाला दिसत नाही का? बिलोली शहराची जनतेची सेवा करण्यासाठी जनतेचा वाली कोणी निर्माण झाला नाही का? शहरामध्ये पिण्यासाठी पाणी नाही, देशमुख नगर येथे अनेक ठिकाणी नाल्या तुटलेल्या अवस्थेत आहे.अनेक ठिकाणी स्लाप पडलेला आहे . नागरीक व वाहनांना जाता येता येत नाही. चालण्यासाठी रस्ते बरोबर नाहीत, शहरातील नाल्याचे सांडपाणी जाण्यासाठी नाल्याची साफसफाई नाही घाण व उग्र वास निर्माण झाला आहे. या सर्वासाठी नांदेड याठिकाणी राहणाऱ्या राजकीय लोकांनी शहरातील मतदार मायबाप जनतेशी काय देणे-घेणे? यांना फक्त बिलोली शहराची सत्ता पाहिजे. सत्तेमधून मत्ता पाहिजे.. मग जनतेची मूलभूत प्रश्ने सोडवावी कोणी? म्हणून 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत शहराचा पाणी पुरवठा सुरळीत नाही झाल्यास व नळपटी माफीवर निर्णय न झाल्यास गोरगरीब गायरानवरील जागा नावे नाही केल्यास 25/2/2026 पासून नगर पालिका कार्यालयासमोर शहरातील जनतेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेख पाशा भाई गादीवाले यांनी दिला आहे.

चौकट
“देशमुख नगरसह संपूर्ण बिलोलीतील जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने जनतेच्या खिशाचा विचार करून तातडीने पाणीपट्टी माफीचा निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेला सोबत घेऊन तीव्र लढा उभारला जाईल,” असे प्रतिपादन समाजसेवक तथा पत्रकार सय्यद रियाज यांनी केले आहे.