बिलोली
महाराष्ट्र वार्ता वृत्तसेवा
PMSHRI जि. प. प्रा. शाळा अटकळी ता. बिलोली येथील शाळेत भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले. तत्पूर्वी संविधानाचे सामुहिक वाचन घेण्यात आले.**यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री कलेटवाड डी एन सौ मुनेश्वर पी डी सौ मठदेवरू एस आर सौ मुधाळे व्ही व्ही,कपिल सर, मल्लिकार्जुन पोलकमवाड तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते**संविधान दिनानिमित्त पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अटकळी येथे संविधान दिनाच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये गीत गायन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा या स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.






