🗓️बुधवार, दि. 19 नोव्हेंबर 2025
‘उमरी नगरपालिका निवडणुक-2025’ च्या अनुषंगाने आज बुधवार, दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी उमरी येथील बाबा महाराज मंदिरासह शहरातील विविध श्रद्धास्थानी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री. राजेशजी पवार साहेब व माझ्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा हा नारळच, विजयाची नांदी मानली जात आहे.
नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार व सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासोबत आज सकाळी प्रचारात सहभागी होऊन नागरिकांशी संवाद साधला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मतदार बंधू-भगिनींना केले.
भाजप पदाधिकारी-कार्यकर्तेयाणि उमरी शहरातील नागरिकांनी देखील यावेळी भाजपच्या विजयाचा दृढ संकल्प केला.
‘विश्वास, सेवा आणि विकास’ हा संकल्प घेऊन काम करताना भाजपच्या विकासाला जनतेची साथ राहील, हे नक्की!
यावेळी श्री. मारोतराव कवळे गुरूजी, श्री. विक्रम देशमुख साहेब, श्री. संजय कुलकर्णी, श्री. सुभाष पेरावार, श्री. खाजा शेठ, नगराध्यक्षा पदाच्या भाजपच्या उमेदवार सौ. स्वप्नाताई माचेवाड, श्री. माचेवाड, नगरपालिका क्षेत्रातील नगरसेवक/नगरसेविका पदाचे सर्व उमेदवार तसेच उमरी शहरातील माता-भगिनी, युवा बांधव, ज्येष्ठ नागरिक तसेच भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने






