बिलोली
बिलोली तालूक्यातील केरुर येथील जिल्हा परिषद शाळेत राज्यसभा खासदार अजित गोपछडे व माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद अटकळी सर्कलचे इच्छूक उमेदवार व सरपंच दैवशिला कूरणापल्ले यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आले. यावेळी माजी सरपंच दीगाबर हजारे माजी सरपंच बालाजी कुरणापल्ले धम्मपाल तरटे मुख्याध्यापक शिक्षक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य यावेळी उपस्थित होते






