महाराष्ट्र वार्ता वृत्तसेवा
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुखेड शहरात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने नामांकन दाखल करण्याचा कार्यक्रम पार पडला. काँग्रेस महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड यांच्या पत्नीं डॉ. दिपाली रॅपनवाड यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीतील सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांनीही आपली नामांकने अधिकृतरीत्या दाखल केली.यावेळी जिल्हाध्यक्ष मा.आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, सुरेंद्र घोडसकर, दिलीप पाटील बेटमोगरेकर, राजू पाटील रावणगावकर,शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र नाईक,शिवसेना तालुका अध्यक्ष उमेश पाटील आडळकर,मनसे तालुका अध्यक्ष संतोष बनसोड, पवार,एम आर पाटील,गोपनर संभाजी पाटील उंदरीकर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकजूट, विकास आणि लोकहिताच्या ध्येयासाठी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केल.






