नांदेड
: मौजे सिरजखोड, रामपूर आणि रामेश्वर (ता. धर्माबाद, जि. नांदेड) येथील गट ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या रोजगार सेवकावर गंभीर गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. अनेक घरकुल लाभार्थ्यांच्या मस्टर (लेबर बजेट) मधील पैसे परस्पर कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर दाखवून उचलल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे.
याचबरोबर सन 2018 मध्ये मयत झालेल्या व्यक्तीच्या नावावर घरकुलाचे मस्टर काढून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा मुद्दाही पुढे आला असून, इतक्या गंभीर प्रकरणानंतरही संबंधित रोजगार सेवकाविरोधात अद्याप कोणतीही ठोस चौकशी किंवा शासकीय कार्यवाही करण्यात आलेली नाही.
या दुर्लक्षामुळे संतप्त लाभार्थी व ग्रामस्थांनी मोठा निर्णय घेत दि. 17 नोव्हेंबर 2025 पासून गट ग्रामपंचायत कार्यालय, सिरजखोड/रामपूर/रामेश्वर समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
news #nanded
नांदेड
: मौजे सिरजखोड, रामपूर आणि रामेश्वर (ता. धर्माबाद, जि. नांदेड) येथील गट ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या रोजगार सेवकावर गंभीर गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. अनेक घरकुल लाभार्थ्यांच्या मस्टर (लेबर बजेट) मधील पैसे परस्पर कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर दाखवून उचलल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे.
याचबरोबर सन 2018 मध्ये मयत झालेल्या व्यक्तीच्या नावावर घरकुलाचे मस्टर काढून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा मुद्दाही पुढे आला असून, इतक्या गंभीर प्रकरणानंतरही संबंधित रोजगार सेवकाविरोधात अद्याप कोणतीही ठोस चौकशी किंवा शासकीय कार्यवाही करण्यात आलेली नाही.
या दुर्लक्षामुळे संतप्त लाभार्थी व ग्रामस्थांनी मोठा निर्णय