बिलोली
विलास शेरे
देगलुर शहरातील अंबिका आईल मिलच्या मागील बाजूस असलेल्या देशी दारू विक्री केंद्रात आज सकाळी सुमारास ११ वाजता धारदार कटरने भोसकून एका युवकाची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेने शहर हादरले आहे.मयत युवकाचे नाव शेख निसार शेख बाबूमिया (वय ३०), रा. लाईन गल्ली देगलूर असे असून, आरोपीचे नाव शादुल शेख सलीम (वय ४५), रा. आनंदनगर, भायेगाव रोड असे सांगण्यात येते. घटनास्थळी असलेल्या साक्षिदारांच्या माहितीनुसार दोघांमध्ये दारूच्या दुकानात किरकोळ वाद झाला. हा वाद एवढा वाढला की आरोपीने अचानक खिशातून धारदार कटर काढून निसारच्या गळ्यावर व शरीरावर वार केले. वार अत्यंत गंभीर असल्याने निसारचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच देगलूर शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे,अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी दिली. या हत्येच्या कारणांबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसून आरोपी नशेत होता, किंवा पूवीर्चा वाद होता का याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. शहरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढवला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा नोंदवणे चालू आहे अशी प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी दिली आहे.




