नांदेड वृत्तसेवा
वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षीण महानगर च्या सर्व आघाड्याच्या पदाधिकारी यांची आज येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकी संदर्भात अतिशय महत्व पूर्ण बैठकीचे आयोजन दिनांक 08/11/2025 रोजी वेळ दुपारी 2 वाजता बैठक आयोजित केली होती या बैठकीत महत्वपूर्ण ठराव करण्यात आले, महानगर दक्षिण विभागातील एकूण 8 प्रभागात समन्वयं समिती, करण्यात यावी याबाबत समन्वयं समिती गठीत करण्याचा ठराव करण्यात आला, तसेच प्रत्येक प्रभागात, इच्छुक उमेदवार यांच्या कडून अर्ज मागवून उमेदवार यांची चाचपनी करावी असे ठरले, इच्छुक उमेदवार यांनी प्रभाग क्र. 19,20, मधील इच्छुक उमेदवार यांनी पक्षाचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड व महासचिव अमृत नरंगकर गोपालसिंग टाक युवा अध्यक्ष,यांच्या कडे पूर्ण बायोडाट्या सह अर्ज करावा तसेच 13,14,15,16,17,18, प्रभागातील इच्छुक उमेदवार यांनी पक्षाचे महासचिव मोहम्मद काशीम, व ऍड शेख बिलाल यांच्याकडे अर्ज करावा तसेच दक्षिण महानगर मध्ये कार्यकर्त्याचा एक दिवसाचेआगामी निवडणुकीसाठी प्रशिक्षण शिबीर घ्यावे असे ठरले, तसेच प्रत्येक प्रभागात मेळावे, बैठका घेण्यावर भर देण्याचे ठरले, तसेच पुढील काळातील निवडणुकी साठी कार्यकर्ते यांनी पूर्ण वेळ व एकजुटीने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आण्यासाठी जोमाने कामाला लागावे असा ठराव केला व या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष फारूक अहमद, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, महासचिव अमृत नरंगलकर,महासचिव मोहम्मद काशिम, कायदेविषयक सल्लगार ऍड बिलाल,जिल्हा युवा महासचिव वैभव लष्करे, युवा अध्यक्ष गोपालसिंग टाक, शिधोधन कापशीकर,मोहम्मद अतिक लीडर, महेश निळकंठवार, राघोजी वाघमारे,पंकज हटकर,सुरेश पवळे,शिवाजी गोडबोले,शेख इमरोद्दीन शेख रियाओद्दीन,मिलिंद शीतळे,सुमेध पाटोळे, जफर जलाल,विजय भंडारे, गौतम डुमने,राजू जमदाडे,गणपत दूधमल, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते




