नायगांव (दयानंद भद्रे)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता नांदेड जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी भाजपचे सर्वच पदाधिकारी-कार्यकर्ते अत्यंत मेहनत घेत आहेत. याच अनुषंगाने काल नरसी (ता. नायगाव) येथे नरसी व मांजरम या दोन जिल्हा परिषद गटातील भाजपच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली.नांदेड जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी नरसी व मांजरम या दोन्हीही गटांतून आपले उमेदवार विजयी करण्याचा दृढ निश्चय यावेळी कार्यकर्त्यांनी केला.’भाजपचे विकासाचे व्हिजन, खेडोपाडी झालेली विकासकामे, नायगाव विधानसभा मतदारसंघातील कोट्यवधींची कामे, लोककल्याणकारी योजना आदींमुळे भाजपवर जनतेचा प्रचंड विश्वास आहे. भाजप हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि विकासाला प्राधान्य देणारा पक्ष आहे, त्यामुळे सर्व जनता आपल्यासोबत आहे. असे असले तरी कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत प्रचंड मेहनत घेऊन काम करण्याची गरज असून, ‘विजय’ हे एकमेव उद्दिष्ट ठेवून काम करा.तुम्ही विजय द्या, आम्ही विकास देऊ’ अशा प्रकारच्या भावना कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केल्या.यावेळी सौ. पुनम पवार यांच्यासह नरसी व मांजरम जिल्हा परिषद गटातील भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




