बिलोली ( दयानंद भद्रे )
तालूक्यातील अटकळी जिल्हा परिषद गट हे ओबिसी महीलासाठी राखीव तर अटकळी गण हे अनुसुचित जाती महीलासाठी राखीव असल्याने येथे निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची संख्या दीवसेनदीवस वाढत आहे अटकळीचे भुमीपूञ शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष व जिल्हा संघटक विजय मुंडकर यांच्या पत्नी सौ. सुरेखा विजय मुंडकर जिल्हा परिषद अटकळी सर्कल मधून शिवसेना ( उबाटा ) कडुन निवडणूक लढवणार असल्याची माहिती स्वतः शिवसेना( उबाटा) जिल्हा संघटक विजय मुंडकर यांनी महाराष्ट्र वार्ता शी बोलताना माहीती दीली विजय मूंडकर हे शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष होते परीसरात मोठा जनाधार असुन सर्व पक्षात त्यांचा मिञ परीवार आहे ते शिवसेनेचे तालुकाप्रमुख असताना बिलोली पंचायत समितीच्या सभापती त्यांच्या भावजय शिलाताई मूंडकर झाल्या होत्या त्यांच्या कुटुंबीयांचा अटकळी सर्कल मध्ये मोठा जनाधार आहे . त्यांचे वडील दीगांबर मुंडकर सरपंच जेष्ठ बंधु प्रल्हाद मूंडकर पंधरा वर्षे उपसरपंच व पत्नी पाच वर्ष सभापती असे अनेक राजकिय पद या परीवारानी भुषवली तर सौ. सूरेखा विजय मुंडकर या ग्रामपंचायत विद्यमान सदस्या आहेत परीवाराचा असलेल्या जनसंपर्काच्या नक्कीच फायदा होईल असे विश्वास विजय मुंडकर यांनी व्यक्त केला




