बिलोली
कुंडलवाडी शहराजवळील हुंनगुंदा व नागणी नदी घाटातून मागील अनेक दिवसांपासून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. हायवा आणि टिप्परच्या सहाय्याने ही रेती वाहतूक केली जात असून याकडे संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मांजरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून ती हायवाच्या सहाय्याने धर्माबाद, कुंडलवाडी तसेच तेलंगणा राज्यात पाठवली जात आहे. मात्र महसूल विभागाकडून केवळ एखाद्या ट्रॅक्टरवर कारवाई करून औपचारिकता पूर्ण केल्याचे दाखवले जात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
हुंनगुंदा व नागणी परिसरात रात्रीच्या वेळी नदीपात्रातून वाळू काढून ती एका ठिकाणी साठवून ठेवली जाते आणि मध्यरात्री तसेच पहाटेच्या सुमारास टिप्परच्या सहाय्याने बाहेर पाठवली जाते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
या प्रकरणाबाबत अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच अवैध वाळू वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांकडून धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये अशीही चर्चा आहे की, काही महसूल कर्मचाऱ्यांना हप्ता देऊन हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येत आहे. “मला कोणी थांबवू शकत नाही,” असे संबंधित व्यक्ती म्हणत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर तातडीने कारवाई होणे अपेक्षित असल्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दिवस-रात्र खुलेआम अवैधरित्या रेती वाहतूक सुरू असून त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन अवैध रेती उपसा व वाहतूक तात्काळ थांबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
हुंनगुंदा हे गाव कुंडलवाडी शहरापासून सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असून या परिसरातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.