कृषी विभाग बिलोली ज्ञानेश्वर शिरगिरे यांच्या तक्रारींकडे दूर्लक्ष
बिलोली
बिलोली शहरातील
खत विक्री करणाऱ्या दुकानदारांचा सध्या एक विचित्र आणि संतापजनक प्रकार शहरातील शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे. बिलोली शहरातील स्थानिक शेतकऱ्यांना खतासाठी ताटकळत ठेवले जात असताना, सीमेपलीकडून म्हणजेच तेलंगणा राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांना मात्र चढ्या दराने युरियाची सर्रास विक्री केली जात असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
नेमका प्रकार काय?
बिलोली शहर हे महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असल्याने येथे दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. सध्या उन्हाळी हंगामासाठी खताची मोठी मागणी आहे. शहरातील एका प्रतिष्ठित खत दुकानात युरियाचा साठा उपलब्ध असूनही, स्थानिक शेतकरी जेव्हा खत मागण्यासाठी जातात, तेव्हा त्यांना “स्टॉक संपला आहे” किंवा “वरतून माल आला नाही” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
किंमतीत मोठी तफावत आणि काळाबाजार:
मिळालेल्या माहितीनुसार, युरियाच्या एका गोणीची शासकीय किंमत साधारण 266 ते 270 रुपयांच्या दरम्यान असताना, तेलंगणातून येणाऱ्या शेतकऱ्यांना हीच गोणी 400 ते 450 रुपयांना विकली जात आहे. जास्त नफा मिळत असल्याने दुकानदार स्थानिक शेतकऱ्यांना डावलून परराज्यातील लोकांशी छुपे व्यवहार करत असल्याचे चित्र दिसत आहे.
तेलंगणातून येणाऱ्या गाड्यांना मागच्या दाराने खत पुरवले जात आहे असुन कृषी विभागाकडे ज्ञानेश्वर शिरगिरे यानी रीतसर तक्रार देऊन ही याकडे दुर्लक्ष का करत आहे ” असा संतप्त सवाल स्थानिक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन कृषी विभागाने संबंधित दुकानातील स्टॉकची तपासणी करावी आणि चढ्या दराने खत विक्री करणाऱ्या व स्थानिक शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या दुकानदाराचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र सीमा लगत असलेल्या तेलंगणा राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांना जीएसटी बिल किंवा प्रिंट बिल न देता कच्चा बिल तयार करून दिले जात आहे. के सायलू या शेतकऱ्यांने शहरातील एका दुकानात युरिया 33 गोणी घेतले असून या शेतकऱ्याला प्रिंट बिल न देता साधं बिल देऊन त्या बिलावर युरियाची किंमत न टाकता तसेच बिल दिले आहे.





