बिलोली ( साईनाथ कांबळे)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. बिलोली येथील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.या वेळी काँग्रेस पार्टीचे अँड भरत पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अभिजित तुडमे,प्रदीप अंकुशकर,इंद्रजित तुडमे,राजू पा. शिंपळकर,आनंद बिरादार, गंगाधर नरवाडे,दिलीप पांढरे,राजेंद्र कांबळे,अमजत चाऊस,सय्यद रियाज,नागनाथ वाडीकर,बळवंत पा. लुट्टे,जाधव,राजकुमार गादगे,बाजिराव पाटील,लक्षिमन शट्टीवर,शेख पाशा भाई,बालाजी हरणे,मिलिंद पटाईत,आदित्य तुडमे,सुमित देवके, सह याप्रसंगी शहरातील विविध स्तरांतील नागरिक, तरुण आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लघुळ येथे सामाजिक बांधिलकी: भव्य रक्तदान शिबीर
शिवजयंतीचे औचित्य साधून लघुळ येथे एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केवळ जल्लोष न करता सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी येथे भव्य रक्तदान शिबीर भरवण्यात आले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा मंत्र जपत अनेक तरुण आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आले. ‘आजच्या काळात रक्ताची गरज भासत असताना, शिवजयंतीनिमित्त असे विधायक कार्य करणे हीच महाराजांना खरी मानवंदना आहे,’ असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी अँड भरत पवार, इंद्रजित तुडमे, सय्यद रियाज, पाशा भाई, राजु गादगे, बाजिराव पाटील,राहुल मामडे,आदित्य तुडमे सह समितीचे विठ्ठल ईबितवार, विठ्ठल गौड, हणमंलू हंगरगे , साईनाथ हंगरगे आदी बिलोली येथे अँड भरत पवार यांनी रक्तदान केले व लघुळ येथे इंद्रजित तुडमे यांनी रक्तदान दिले.




