*
नायगांव नांदेड जिल्हात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आजी माजी आमदार व जिल्हा परिषद सदस्य मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसत आहेत. लोकप्रिय नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून नगरपरिषद निवडणूकीत नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबर चा पक्ष ठरला आहे. त्यामुळे त्यातच नायगांव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसिद्ध डॉ कागडे पती पत्नी यांचे सुभाष नगर ला भेटी गाठी वाढल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर डॉ कागडे असल्यांचे चर्चा नायगांव व मिञ मंडळी मध्ये आहे. लोकसभा निवडणूकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवडणूक प्रचारात डॉ मिनाक्षी कागडे व डॉ शिवाजी कागडे यांनी नायगाव तालुक्यातील खेडोपाड्यात प्रचार व प्रसार केला व प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला.2012 जिल्हा परिषद सदस्या बरबडा गटातुन कै.बापुसाहेब गोरठेकर साहेबांच्या कृपेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. नांदेड जिल्हात त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याच्या माध्यमातून जनसंपर्क मोठा आहे.जिल्हा परिषद सदस्या असताना बरबडा सर्कल मध्ये त्यांनी विकास कामांना गती देऊन विकास घडवून आणला हे सर्वांना माहीत आहे.उमरा सर्कल मध्ये 2017 ला पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक लढवली व स्वताच्या मेहनतीने 6000 मते मिळवली पण थोड्या फरकाने पराभव पत्करावा लागला.कारण तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दगाफटका केल्यामुळे व मदत ही केली नाही त्यामुळे डॉ मिनाक्षीताई कागडे यांचा पराभव झाला.2025 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ मिनल ताई खतगांवकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन प्रचार केला व निवडून आणण्यासाठी जयराज पॅलेस नायगाव येथे ऐतिहासिक मेळावा आयोजित करून डॉ मिनल ताई निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला.अंजना हास्पीटलच्या माध्यमातून आरोग्य सेवा त्यांचा 25 वर्षांपासून चा जनसंपर्क मोठा आहे.म्हणुन त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी निश्चित फायदा होईल यात शंका नाही.काँग्रेस पक्षात असताना महाराष्ट्र प्रदेश कमिटीत विविध पदावर त्यांनी उत्तम प्रकारे काम केले आहे.उच्चशिक्षित ,समाजकार्याचा, आरोग्य सेवेचा व राजकीय क्षेत्रातील त्यांचा अनुभव मोठा आहे.काही दिवसातच शाहू, फुले प.पू.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला माननार्या अजित दादा गट राष्ट्रवादी ची घड्याळ पुन्हा हाताला बांधतील असे सोशल मिडियाच्या माध्यमातून कळाले आहे.*
| gghhhg | |




