अटकळी येथील किशोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी गणेश कदम, राजेश पोलकमवाड ,अमोल शेरे, विलास शेरे, संतोष मेहत्रे, देविदास भिंगे ,मारुती औरादे, भास्कर भालेराव, शेख गनी यांनी सर्व मिळून शाळेला 50 पुस्तकाचा संच दिला आहे आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांचा ज्ञानात भर पडावी व वेगवेगळे पुस्तके वाचनात यावे व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही शाळेला पुस्तकाचा संच दिला आहे यापुढेही आम्ही शिकलेल्या शाळेला मोठी मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी प्रस्ताविक शाळेतील इंग्रजी शिक्षक गंगाराम दोनतूलवार सर व तसेच माजी विद्यार्थी अमोल शेरे आणि विकास शेरे यांनी आपले शाळेतील जुने अनुभव सांगितले व तसेच शाळेतील शिक्षकांनी शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार दिले असे मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात शाळेचे प्राचार्य राजेश्वर आटकळे यांनी शाळेत राबविले जाणारे वेगवेगळे उपक्रम व विद्यार्थ्यांनी तयार केलेली परसबाग शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होण्यासाठी केलेले प्रयत्न आदींची माहिती माजी विद्यार्थ्यांना दिली व शाळेला पुस्तकाचा संच दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी राजेंद्र मोरे विजयकुमार कचवे अशोक विभुते, संभाजीराव गव्हाणे, दत्तात्रेय सिंगनवाड,राजेंद्रकुमार बैस, चंद्रकांत कनशेट्टी साहेबराव तगेवार आदी मंडळी व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




