महसुल प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
बिलोली तालुक्यात मुरूम माफीयांना आशिर्वाद कोनाचा?
बिलोली प्रतीनीधी
बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथील गट क्रमांक 205 सय्यद मुनीर यांच्या नावाने नाम माञ मुरुम खोदाई परवानगीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खननामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हजारो ब्रास राॅयलटी नावाखाली उत्खनन दिवस रात्र चालुच आहे मुरूम परिसरातील शेतजमिनी, रस्ते आणि पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आजुबाजुला असलेले शेतकरी यांचा दावा आहे.उत्खननासाठी वापरली जाणारी मोठ्या क्षमतेची यंत्रसामग्री आणि हायवा टिपर दिवस-रात्र सुरू असलेली वाहतूक यामुळे परिसरात अवैध उत्खनन चालत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विभागांकडून कोणतीही कारवाई न होता उत्खनन सुरूच आहे. काही नागरिकांनी तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसील कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला असून यामागे “हप्त्यांचे व्यवहार” सुरू असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. मात्र प्रशासनाकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
दरम्यान, राज्यात अलीकडेच आयएएस अधिकाऱ्यांशी संबंधित एक प्रकरण चर्चेत असताना, त्याच धर्तीवर बिलोली तालुक्यातील हा उत्खननाचा मुद्दा अधिक गंभीर ठरत असल्याचे नागरिकांचे मत आहे. तसेच, या कार्यवाहीवर वरिष्ठ पातळीवरून दडपण आणले जात असल्याबद्दलही काहींच्या तक्रारी आहेत. हे सर्व दावे स्थानिकांच्या म्हणण्यावर आधारित असून प्रशासनाकडून याची स्वतंत्र चौकशी अपेक्षित आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या उत्खननाची तत्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जनतेमधून होत आहे . त्यांनी पर्यावरणीय नुकसान, रस्त्यांची नासधूस आणि सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.
प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करून उत्खनन परवान्यांची पडताळणी, वाहनांची तपासणी आणि उत्खननाचा म्याप याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मुरुम माफीयाकडुन उत्खनन रोखला पाहीजे अशी जनतेची मागणी आहे.





