बिलोली तालुक्यातील भोसी येथील शेतकरी गजानन विश्वनाथ शिकारे यांनी 5 मार्च 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती .दि 17 डिसेंबर 2025 रोजी आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबीयास मिळणाऱ्या शासकीय मदतीच्या धनादेशाचे वाटप बिलोली तहसीलदार गजानन शिंदे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार दिपक मराले यांचा हस्ते 1 लाखाचे धनादेश मयत शेतकरी गजानन शिकारे यांच्या कुटुंब प्रमुख विश्वनाथ शिकारे यांना देण्यात आले. यावेळी नाम फाउंडेशन चे जिल्हा प्रसिद्दी प्रमुख भाऊराव मोरे ,मराठवाडा जनता विकास परिषद चे बिलोली तालुका अध्यक्ष इंद्रजित तुडमे , सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज,माधव एडके,सतिष बळवंतकर, सुनिल जेठे सह तहसीलचे अव्वल कारकून दीपक पाईकराव, साईनाथ आमेटवार उपस्थित होते.






