महाराष्ट्र वार्ता वृत्तसेवा
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ज्यांच्यावर भाजपने तीव्र आरोप केले होते, त्याच काशिनाथ चौधरीला रविवारी स्थानिक नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप पक्षात प्रवेश केला आहे. ज्या नेत्यावर गंभीर आरोप करून धुमाकूळ माजवला होता, तोच नेता आता पक्षाच्या व्यासपीठावर उभा आहे. या सर्व प्रकारावर भाजपने केलेल्या आरोपांचे काय झाले? असा संतप्त सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.काशिनाथ चौधरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्थानिक नेते आहेत. यांच्यावर भाजपने गडचिंचले साधू हत्या प्रकरणात ‘मुख्य आरोपी’ असल्याचा आरोप केले होते. तसेच या प्रकरणात तत्कालीन ठाकरे सरकारला घेरले होते.एकनाथ शिंदे यांनी तर बंडखोरीच्या कारणांपैकी साधू हत्याकांड हे एक कारण सांगून, “साधूंची हत्या आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो,” असे विधान केले होते. सद्यस्थिती: ज्यांच्यावर हे सर्व आरोप झाले, तेच काशिनाथ चौधरी आता डहाणू येथे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आता त्या आरोपाचे काय?चौधरी यांच्यासोबत ३ हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने, पालघरच्या राजकारणात हा मोठा भूकंप मानला जात आहे.नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने आता कोणत्या तोंडाने गडचिंचले प्रकरणावर बोलावे? त्यांचे ते ‘तीव्र’ आरोप, ती ‘न्यायाची’ मागणी आता विरून गेली की काय? “राजकीय सोयीसाठी भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकते, हेच या प्रवेशातून सिद्ध झाले आहे.पालघर साधू हत्या प्रकरण नेमके काय ?१६ एप्रिलच्या 2022 रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांना अटक केली होती. या प्रकरणात १०८ साक्षीदारांचा जबाब नोंदवला गेला.






