बिलोली (दयानंद भद्रे)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका जाहीर होण्यास काही दीवस असतानाच बिलोली तालूक्यातील अटकळी सर्कल हे ओबिसी महीलासाठी राखीव असल्याने सर्वच पक्षात मीच उमेदवार असल्याचे सांगत इच्छुक उमेदवारांची पती दीवस राञ जनसंपर्क करत आहेत यातच केरुरचे माजी सरपंच व ओबिसी नेते बालाजी कुरणापल्लै यांच्या पत्नी विद्यमान सरपंच दैवशिला कुरणापल्ले यांनाच भाजपाकडुन उमेदवारी मिळेल अशी चर्चा सर्कल मध्ये मोठा प्रमाणावर आहे . ओबिसी नेते बालाजी कुरणापल्लै यांचा तालुका आणि सर्कल मध्ये जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या पत्नी विद्यमान सरपंच दैवशिला कुरणापल्ले हे उच्च शिक्षित असुन केरुरच्या सरपंचपदाच्या काळात त्यांनी गावाला एक आदर्श गाव संकल्प व्यसनमुक्ती गांव गावात नागरिकाना लागणार्या भौतीक सूविधा गावकऱ्यांना उपलब्ध करून दिली. गावाला विकासाचा माॅडेल तयार केला सर्कल मध्ये जर उमेदवारी निश्चित झाली तर इतर पक्षांच्या उमेदवारांना पराभव करण्यासाठी भक्कम उमेदवार म्हणून सौ. दैवशिला कुरणापल्ले यांनाच उमेदवारी निश्चित झाली तर त्यांचा विजय निश्चित असल्याचे चर्चा केली जात आहे





