बिलोली
महाराष्ट्र वार्ता वृत्तसेवा
नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण खुले असल्याने अनेक इच्छुकांनी जनसंपर्कासाठी कंबर कसली आहे. भारतीय जनता पार्टी कडुन माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचणवार, भाजपा मंडळ अध्यक्ष इंद्रजित तुडमे या दोघांची नावे पुढे येत आहे, आघाडी कडून माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, काँग्रेस कडुन भरत पवार, डॉ शंखपाळे यांच्या सह अनेक जन इच्छुक आहेत.नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच बिलोली शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारणसाठी जाहीर झाल्याने एका गटातील इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली आहे. आरक्षण घोषित होताच समीकरणांमध्ये बदल झाला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. प्रमुख पक्षांतर्फे बैठका, अंतर्गत चर्चा आणि रणनीती ठरविण्याचे सत्र सुरू झाले असून, नगराध्यक्ष पदासाठी चुरस वाढली आहे. त्यामुळे अनेक नवोदितांना संधी मिळणार असली तरी गटातटाच्या राजकारणाला महत्त्व येणार आहे.चौकट शहराचा विकास व्हावा तेवढा झाला नाही मजुरांना काम नाही आज हि मंजुरीसाठी तेलंगणा जावे लागते .गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी,जनतेचे निस्वार्थ कामे करणारे, रोजगार उपलब्ध करुन देणारे,वेळ प्रसंगी धावून येणारे नवीन चेहरांनाच संधी देऊ अशी चर्चा नागरिकांत ऐकावयास मिळत आहे.




