बिलोली वृत्तसेवा
बिलोली तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक अटकळी पंचायत समिती गण हे अनुसुचित जाती महीला साठी राखीव असुन या गणातुन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भास्कर तरटे यांच्या पत्नी सौ .मिराताई तरटे ह्या पंचायत समिती गणातुन उमेदवारीसाठी माजी मंत्री,मा.खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्याकडे मागणी केली आहे.
भास्कर तरटे हे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे समर्थक असुन अत्यंत विश्वासू आहेत.अनेक वर्षांपासून खतगावकर साहेब यांच्या सोबत राजकिय प्रवाहात जवळ आहेत . रास्त भाव धान्य दूकानदार संघटना ता.बिलोली चे उपाध्यक्ष होते त्यामुळे त्यांचे सर्वांसोबत मनमिळाऊ स्वभाव सहकार्याची भावना आणि घनिष्ठ संबंध प्रत्येक गावात आहेत. अटकळी पंचायत समिती गणात मित्र परिवार व रास्त भाव दुकानदार सोबत असल्यामुळे चांगली पकड व सर्वात सोबत स्नेह पूर्वक सहसंबंध आहेत. सो मीराताई भास्कर तरटे केरुर ग्रामपंचायतचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सक्रिय महिला सभासद आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमांतर्गत उत्तम कामगिरी बजावली आहे म्हणून आटकळी पंचायत समिती गण महिला राखीव अनुसूचित जातीसाठी असल्यामुळे उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी केली आहे




